व्हिडिओ पाहण्यासाठी

यहोवाचे साक्षीदार इतर धर्मांचा आदर करतात का?

यहोवाचे साक्षीदार इतर धर्मांचा आदर करतात का?

 होय, कारण “सर्व लोकांचा आदर करा” असे जे बायबल शिकवते त्याचे आम्ही पालन करतो. (१ पेत्र २:१७, ईझी टू रीड भाषांतर) उदाहरणार्थ, काही देशांमध्ये लाखो यहोवाचे साक्षीदार आहेत. पण असे असले तरी राजकारण्यांवर किंवा न्यायव्यवस्थेवर दबाव आणून ते इतर धार्मिक गटांवर निर्बंध किंवा बंदी घालण्याचा प्रयत्न करत नाहीत. किंवा आम्ही कोणतेही कायदे बनवून समाजावर आमची नैतिक मूल्ये व धार्मिक विश्‍वास लादण्याच्या प्रयत्न करत नाही. याउलट, आम्ही इतर धर्माच्या लोकांचा आदर करतो आणि त्यांच्याकडूनही तीच अपेक्षा करतो.—मत्तय ७:१२.