व्हिडिओ पाहण्यासाठी

तुम्ही उपासनेत क्रॉसचा उपयोग का करत नाही?

तुम्ही उपासनेत क्रॉसचा उपयोग का करत नाही?

 पुष्कळ लोक क्रॉस हे ख्रिस्ती धर्माचे ओळख चिन्ह आहे असे समजतात. यहोवाचे साक्षीदार ख्रिस्ती असले तरीसुद्धा ते उपासनेत क्रॉसचा उपयोग करत नाहीत. का नाही?

 एक कारण म्हणजे, बायबलमध्ये कोठेही येशूचा मृत्यू क्रॉसवर झाल्याचा उल्लेख नाही. उलट त्याचा मृत्यू वधस्तंभावर झाल्याचा उल्लेख आढळतो. शिवाय, बायबलमध्ये ख्रिश्‍चनांना “मूर्तिपूजेपासून दूर पळा” अशी कडक ताकीद देण्यात आली असल्यामुळे ते उपासनेत क्रॉसचा उपयोग करत नाहीत.—१ करिंथकर १०:१४; १ योहान ५:२१.

 येशूने म्हटले: “तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” (योहान १३:३४, ३५) या वचनानुसार येशूने त्याच्या खऱ्‍या अनुयायांचे ओळख चिन्ह क्रॉस किंवा इतर कोणतीही प्रतिमा नव्हे तर त्यांच्यातील निःस्वार्थ प्रेम असेल, असे स्पष्टपणे सांगितले.