व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मेहनत करायला शिकणं हे व्यायाम करण्यासारखं आहे, यामुळे तुम्हाला आज आणि भविष्यातही फायदा होईल

तरुणांसाठी

११: मेहनत

११: मेहनत

याचा काय अर्थ होतो?

मेहनती व्यक्‍ती काम करण्यापासून पळ काढत नाही. स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि इतरांना मदत करण्यासाठी कष्ट करायला त्यांना आवडतं. मग ते काम इतरांच्या नजरेत येण्यासारखं नसलं तरीही.

हे का महत्त्वाचं?

आवडत असो वा नसो, जीवनात आपल्याला अनेक जबाबदाऱ्‍या पार पाडाव्या लागतात. आज जगात अनेकांना कष्ट करायला आवडत नाही, पण जर तुम्ही मेहनती असाल तर तुम्हाला याचा फायदाच होईल.—उपदेशक ३:१३.

“जेव्हा आपण काम करताना मेहनत घेतो तेव्हा आपल्याला आत्मसन्मान आणि समाधान लाभतं हे मी शिकलोय. या भावनेमुळे मला माझ्या कामाबद्दल आवड निर्माण करायला मदत झाली आहे. कामाच्या बाबतीत चांगल्या सवयी असल्यामुळे तुम्ही चांगलं नाव कमवू शकता.”—रायन.

बायबल तत्त्व: “सर्व श्रमांत लाभ आहे.”—नीतिसूत्रे १४:२३.

तुम्ही काय करू शकता?

कामाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी पुढे दिलेले सल्ले लागू करा.

काम चांगल्या रीतीने करायला शिका. तुम्ही घरात काम करत असाल, तुमचा होमवर्क पूर्ण करत असाल किंवा नोकरी करत असाल, तर या सर्व गोष्टी पूर्ण मनाने करा. तुमचं काम तुम्ही चांगल्या रीतीने पूर्ण केल्यावर त्यात आणखी काही सुधारणा करता येतील का, ते पाहा. तुम्ही ते काम कमी वेळेत किंवा आणखी चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकता का? तुमच्या कामात तुम्ही जितकं निपुण व्हाल तितकंच तुम्हाला तुमच्या कामाचा आनंद मिळेल.

बायबल तत्त्व: “जर एखादा माणूस त्याच्या कामात तरबेज असला तर तो राजाची चाकरी करण्यायोग्य असतो. त्याला बिनमहत्त्वाच्या लोकांसाठी काम करावे लागणार नाही.”—नीतिसूत्रे २२:२९, ईझी-टू-रीड व्हर्शन.

मेहनत घेण्याचे फायदे. जेव्हा तुम्ही दिलेलं काम जबाबदारीने करता तेव्हा इतरांनाही त्यापासून फायदा होतो. उदाहरणार्थ, जर आपण घरातलं काम मेहनतीने केलं तर त्यामुळे आपल्या कुटुंबातील इतरांचा भार हलका होईल.

बायबल तत्त्व: “घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे.”—प्रेषितांची कार्ये २०:३५.

जास्त काम करा. अपेक्षेपेक्षा जास्त काम करण्याचा प्रयत्न करा. असं केल्यामुळे इतरांच्या दबावामुळे नाही, तर तुम्हाला इच्छा आहे म्हणून तुम्ही जास्त काम करता हे दिसून येईल.—मत्तय ५:४१.

बायबल तत्त्व: “हे चांगले कृत्य तू बळजबरीने नाही, तर तुझ्या स्वतःच्या इच्छेने करावे, असे मला वाटले.”—फिलेमोन १४.

संतुलन ठेवा. मेहनती लोक आळशी किंवा तास न्‌ तास काम करणारे नसतात. कामाच्या आणि आरामाच्या बाबतीत संतुलित दृष्टिकोन ठेवल्यामुळे ते आनंदी असतात.

बायबल तत्त्व: “तुमच्याजवळ जे आहे त्यात समाधान मानणे हे अधिकाधिक मिळवण्यासाठी झगडण्यापेक्षा खूप चांगले आहे.”—उपदेशक ४:६, ईझी-टू-रीड व्हर्शन.