व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

टेहळणी बुरूज क्र. १ २०२३ | मनाचं आरोग्यही जपायला हवं!

आज जगभरात लाखो लोकांना मानसिक आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. सर्व वयांच्या, संस्कृतींच्या, वर्णांच्या, वंशांच्या आणि धर्मांच्या व्यक्‍तींना, तसंच गरीब, श्रीमंत, शिक्षित किंवा अशिक्षित अशा सर्व प्रकारच्या लोकांना या समस्यांनी ग्रासलंय. पण मानसिक आजार म्हणजे काय? आणि या आजारांमुळे लोकांवर काय परिणाम होतो? या अंकात आपण योग्य औषधोपचार घेण्याच्या महत्त्वाबद्दल चर्चा करू या. तसंच, या आजारांचा सामना करणाऱ्‍यांना बायबल कोणकोणत्या व्यावहारिक मार्गांनी मदत करू शकतं तेसुद्धा पाहू या.

 

जगभरात मानसिक आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ

मानसिक आजार कोणत्याही वयाच्या किंवा पार्श्‍वभूमीच्या लोकांना होऊ शकतो. मानसिक आजारांचा सामना करण्यासाठी बायबलचा सल्ला कसा मदतीचा ठरू शकतो ते पाहा.

देवाला तुमची काळजी आहे

इतर कोणत्याही व्यक्‍तीपेक्षा यहोवा देव तुमचे विचार आणि भावना जास्त चांगल्या प्रकारे समजू शकतो याची तुम्ही खात्री का बाळगू शकता?

१ | प्रार्थना—“आपल्या सगळ्या चिंता त्याच्यावर टाकून द्या”

तुम्हाला अस्वस्थ करणाऱ्‍या कोणत्याही विचाराबद्दल किंवा चिंतेबद्दल तुम्ही देवाला प्रार्थना करू शकता का? चिंता विकार असलेल्यांना प्रार्थनेमुळे मदत होते का?

२ | बायबलच्या वचनांमधून सांत्वन

बायबल आपल्याला एक पक्की आशा देतं की लवकरच अशी वेळ येईल जेव्हा त्रासदायक भावनांशी आपल्याला कधीही झगडावं लागणार नाही.

३ | बायबलमधल्या उदाहरणांतून मदत

त्रासदायक भावनांचा सामना करताना बायबलमधल्या स्त्रीपुरुषांच्या उदाहरणांमुळे आपल्याला मदत होईल, कारण त्यांनाही आपल्यासारख्याच भावना होत्या.

४ | बायबलमधले व्यावहारिक सल्ले

बायबलच्या वचनांवर विचार केल्यामुळे आणि गाठता येतील अशी ध्येयं ठेवल्यामुळे तुम्हाला मानसिक आरोग्याच्या समस्यांचा सामना करायला कशी मदत होऊ शकते ते पाहा.

मानसिक आजाराचा सामना करणाऱ्‍यांना आपण कशी मदत करू शकतो?

मानसिक आजाराचा सामना करत असलेल्या मित्र किंवा मैत्रिणीला आधार दिल्यामुळे त्यांना खूप मदत होऊ शकते.