व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जगातल्या जवळजवळ सर्व मुख्य धर्मांतले लोक असं मानतात, की मृत्यूनंतर आत्मा अमर राहतो

मुख्य विषय | जीवन आणि मृत्यू यांबद्दल बायबल काय म्हणतं?

कोड्यात टाकणारा प्रश्न

कोड्यात टाकणारा प्रश्न

जीवन आणि मृत्यू यांविषयी लोकांची अनेक वेगवेगळी मतं आहेत. मृत्यूनंतर एक व्यक्ती वेगळ्या रूपात किंवा दुसऱ्या विश्वात जिवंत राहते, असं काहींना वाटतं. तर इतर काही जण असा विचार करतात, की मृत्यूनंतर आपला पुनर्जन्म होतो. शिवाय, असेही काही आहेत जे विचार करतात, की मृत्यू झाल्यावर एका व्यक्तीचं अस्तित्व नाहीसं होतं.

या विषयाबद्दल तुमचादेखील स्वतःचा एक विश्वास असू शकतो. आणि हा विश्वास तुमच्या संगोपनाच्या किंवा संस्कृतीच्या आधारावर असू शकतो. मृत्यूनंतर आपलं काय होतं, याविषयी लोकांची इतकी वेगवेगळी मतं असताना कोड्यात टाकणाऱ्या या प्रश्‍नाचं खरं आणि भरवशालायक उत्तर आपल्याला कुठून मिळू शकेल?

धार्मिक पुढारी कितीतरी शतकांपासून लोकांना अमर आत्म्याची शिकवण देत आले आहेत. जगातले मुख्य धर्म मानणारे जवळजवळ सर्व लोक अमर आत्म्याच्या शिकवणीवर विश्वास ठेवतात. या धर्मांत ख्रिस्ती, हिंदू, यहुदी, मुस्लिम आणि इतरही मुख्य धर्मांचा समावेश होतो. ते मानतात की एक व्यक्ती मेल्यानंतर एका आत्मिक जगात जिवंत राहते. तर, बौद्ध धर्म मानणारे लोक विश्वास करतात, की एका व्यक्तीचा अनेकदा पुनर्जन्म होतो आणि मग शेवटी ती दुःख व कष्टातून मुक्त असलेल्या स्थितीत पोहोचते. या स्थितीला ते निर्वाण असं म्हणतात.

या शिकवणींमुळे जगातले बरेच लोक असा विश्वास करतात, की मृत्यू खरंतर असं एक दार आहे ज्यातून एक व्यक्ती दुसऱ्या विश्वात प्रवेश करते. त्यामुळे मृत्यू हा जीवनचक्रातला एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे आणि मानवांसाठी देवाची हीच इच्छा असावी असं त्यांना वाटतं. पण याविषयी बायबलमध्ये काय सांगितलं आहे? या प्रश्‍नाचं उत्तर तुम्हाला पुढच्या लेखात मिळेल. ते उत्तर जाणून तुम्हाला कदाचित आश्चर्यदेखील होईल.