व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

संकटांच्या विळख्यात जग

३ | नाती जपा

३ | नाती जपा

हे महत्त्वाचं का आहे?

जगातल्या समस्यांमुळे लोकांच्या जीवनात चिंतेचं प्रमाण वाढत चाललं आहे. आणि नकळत याचा प्रभाव लोकांच्या नात्यांवर होतो.

  • काही लोक मित्रांना टाळतात आणि एकटं राहू लागतात.

  • काही घरांत नवरा-बायकोंमधले वाद वाढतात.

  • आपली मुलं कोणत्या गोष्टींना तोंड देत आहेत याकडे आईवडिलांचं दुर्लक्ष होतं.

तुम्हाला काय माहीत असलं पाहिजे?

  • खासकरून कठीण काळात शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी मित्र असणं आवश्‍यक आहे.

  • जगातल्या समस्यांमुळे येणारा तणाव तुमच्या कुटुंबात अनपेक्षित समस्या निर्माण करू शकतो.

  • सतत ऐकायला मिळणाऱ्‍या वाईट बातम्यांमुळे मुलांच्या मनावर किती परिणाम होतोय, हे कदाचित तुमच्या लक्षात येणार नाही.

तुम्ही आत्ता काय करू शकता?

बायबल म्हणतं: “खरा मित्र नेहमी प्रेम करतो; दुःखाच्या प्रसंगी तो भावासारखा होतो.”​—नीतिवचनं १७:१७.

तुम्हाला मदत करेल आणि चांगला सल्ला देईल असा एखादा मित्र किंवा मैत्रीण तुम्हाला आहे का? कोणालातरी आपली काळजी आहे, ही जाणीव तुम्हाला दररोजच्या समस्यांना तोंड द्यायला मदत करू शकते.