व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मुख्य विषय

आपल्या सवयींवर ताबा कसा मिळवाल?

आपल्या सवयींवर ताबा कसा मिळवाल?
  • ऑस्टीनच्या घड्याळाचा अलार्म वाजतो. त्याच्या डोळ्यात अजून झोप आहे. पण नेहमीप्रमाणे तो लगेच उठतो, रात्रीच बाहेर काढून ठेवलेला आपला जॉगिंगचा सूट चढवतो आणि जॉगिंगला जातो. ऑस्टीन गेल्या वर्षापासून आठवड्यातून तीनदा जॉगिंगला जात आहे.

  • लॉरीचं आपल्या पतीशी भांडण झालं. ती चिडून, रागाच्या भरात तणतणत किचनमध्ये जाते आणि चॉकलेटचा डब्बा उघडते आणि त्यातली कॅडबरी, चॉकलेटं भराभर खाते. राग आल्यावर ती नेहमी असंच करते.

ऑस्टीन आणि लॉरीमध्ये कुठल्या एका गोष्टीचं साम्य आहे? दोघंही कळत, नकळत जे करत आहेत त्यामागे एक प्रबळ शक्ती आहे. आणि ती शक्ती म्हणजे त्यांना असलेली सवय.

तुमच्याबद्दलही हेच खरं आहे का? कोणत्या चांगल्या सवयी तुम्ही स्वतःला लावू इच्छिता? जसं की, रोज व्यायाम करणं, पुरेशी झोप घेणं किंवा आपल्या जवळच्या लोकांशी नेहमी संपर्कात राहणं. कदाचित, तुमचंही अशा काही गोष्टी करण्याचं ध्येय असेल.

याउलट अशा काही वाईट सवयी असतील ज्या तुम्हाला सोडून द्यायच्या असतील जसं की, सिगरेट ओढणं, खूप जंक फूड खाणं किंवा इंटरनेटवर तास न्‌ तास घालवणं.

वाईट सवयींवर मात करणं खरंच खूप अवघड जाऊ शकतं. कारण वाईट सवय ही थंडीच्या दिवसात एका उबदार रजईसारखी असते. ज्यात शिरणं तर सोपं असतं, पण बाहेर निघणं खूप कठीण!

मग असं असल्यास तुम्ही आपल्या सवयींवर ताबा कसा मिळवू शकता आणि वाईट सवयी सोडून स्वतःला चांगल्या सवयी कशा लावू शकता? बायबलमधील तत्त्वांवर आधारित असलेले तीन सल्ले आपल्याला कशी मदत करू शकतात हे बघू या. (g16-E No. 4)