व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबल प्रश्‍नांची उत्तरे

बायबल प्रश्‍नांची उत्तरे

देवाचे नाव काय आहे?

आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना एक व्यक्‍तिगत नाव असते. इतकेच काय तर आपल्या घरातील पाळीव प्राण्यांनादेखील नाव असते! तर मग, देवालाही व्यक्‍तिगत नाव असू नये का? बायबलमध्ये देवाला अनेक पदव्या देण्यात आल्या आहेत. जसे की, सर्वशक्‍तिमान देव, सार्वभौम प्रभू, आणि सृष्टिकर्ता. पण त्याला एक व्यक्‍तिगत नावदेखील आहे.निर्गम ६:३ वाचा, तळटीप पाहा.

बायबलच्या अनेक भाषांतरांमध्ये स्तोत्र ८३:१८ या वचनात देवाचे नाव सांगण्यात आले आहे. उदाहरणार्थ, मराठीतील पंडिता रमाबाई भाषांतरात वरील वचनात असे म्हटले आहे: “ज्या तुझे नाव यहोवा असे आहे तो तूच मात्र अवघ्या पृथ्वीवर परात्पर आहेस.”

आपण देवाचे नाव का वापरावे?

आपण देवाचे व्यक्‍तिगत नाव वापरावे अशी त्याची इच्छा आहे. आपल्या प्रियजनांबरोबर जसे की आपल्या जवळच्या मित्रांबरोबर बोलताना आपण त्यांचे नाव घेतो, खासकरून त्यांची तशी इच्छा असेल तर. तर मग देवाशी बोलतानाही आपण त्याचे व्यक्‍तिगत नाव घेऊ नये का? शिवाय, येशूनेही आपल्याला देवाचे नाव वापरण्याचे उत्तेजन दिले आहे.मत्तय ६:९; योहान १७:२६ वाचा.

पण, देवाचे मित्र बनण्यासाठी आपण फक्‍त त्याच्या नावाबद्दलच नव्हे तर त्याच्याबद्दलही आणखी जास्त जाणून घेतले पाहिजे. जसे की, देव कसा आहे? त्याच्या जवळ जाणे शक्य आहे का? या प्रश्‍नांची उत्तरे तुम्हाला बायबलमध्ये मिळतील. (w१३-E ०१/०१)