व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला माहीत होतं का?

तुम्हाला माहीत होतं का?

उत्खननात मिळालेले पुरावे बायबलचं समर्थन करतात का?

यशया २०:१ मध्ये उल्लेख करण्यात आलेला अश्शूरी राजा सर्गोन दुसरा

बिब्लिकल आर्कियॉलॉजी रिव्ह्यू या नियतकालिकाच्या एका लेखात सांगितलं होतं, की बायबलमधल्या इब्री शास्त्रवचनांतील “कमीत कमी ५०” व्यक्ती खरंच अस्तित्वात होते हे उत्खननात मिळालेल्या पुराव्यांमुळं आता सिद्ध झालं आहे. या व्यक्तींमध्ये नामांकित राजा दावीद, हिज्किया, मनहेम, पेकह यांसारखे यहूदाचे व इस्राएलचे १४ राजे आहेत. शिवाय या यादीत इजिप्तचे ५ फारो आणि अश्शूर, बॅबिलॉन, मवाब, पर्शिया आणि सिरिया या देशांचे १९ राजे यांचाही समावेश होतो. बायबलमधील राजांसोबतच काही महायाजक, शास्त्री आणि इतर अधिकारी हेदेखील खरोखरचे व्यक्ती होते याचेही पुरावे उत्खननात मिळाले आहेत.

वर उल्लेख केलेल्या नियतकालिकानुसार बरेच विद्वान खातरीनं सांगतात की हे सर्व लोक खरंच अस्तित्वात होते. बायबलमधल्या ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत हेरोद, पंतय पिलात, तिबिर्य, कयफा आणि सिर्ग्य पौल या व्यक्तींचा उल्लेख करण्यात आला आहे. आणि हे लोक अस्तित्वात होते याचे पुरावेही उत्खननात मिळाले आहेत.

पवित्र भूमी म्हटल्या जाणाऱ्या देशांतून सिंह केव्हा लुप्त झाले?

प्राचीन बॅबिलॉनमधील चकचकीत विटांवर रेखाटलेलं चित्र

हे खरं आहे की पवित्र भूमी म्हटल्या जाणाऱ्या इस्राएल आणि पॅलेस्टाईन देशांमध्ये आज सिंह लुप्त झाले आहेत. पण बायबलमध्ये सिंहांचा १५० वेळा संदर्भ दिला आहे. यावरून हे कळतं की बायबलच्या लेखकांना सिंहांची माहिती होती. यातील बरेच संदर्भ लाक्षणिक असले तरी काही संदर्भावरून दिसून येतं की लोकांचा सिंहांशी आमना-सामना झाला होता. जसं की, शमशोन, दावीद आणि बनाया यांनी सिंहांना ठार केल्याचा उल्लेख आहे. (शास्ते १४:५, ६; १ शमुवेल १७:३४, ३५; २ शमुवेल २३:२०) तर काही ठिकाणी सिंहांनी लोकांना मारल्याचा उल्लेख आहे.१ राजे १३:२४; २ राजे १७:२५.

प्राचीन काळात, आशिया मायनर आणि ग्रीस या देशांपासून ते पॅलेस्टाईन, सिरिया, मेसोपोटेमिया आणि उत्तर-पश्‍चिम भारतापर्यंत आशियाई सिंह पाहायला मिळायचे. इथले लोक सिंहाला घाबरायचे पण त्याला मानायचेही; म्हणून ते सिंहाचे चित्र भिंतींवर रंगवायचे. प्राचीन बॅबिलॉनच्या प्रमुख मंदिराला जोडणाऱ्या पवित्र मार्गाच्या भिंतींवर सिंहांच्या मोठमोठ्या प्रतिमा असायच्या.

इसवी सन १२ व्या शतकाच्या शेवटी पॅलेस्टाईनमध्ये युद्ध झालं होतं. त्या वेळी काही राजांनी सिंहांची शिकार केल्याचं म्हटलं जातं. त्यामुळं १४ व्या शतकाच्या सुरुवातीला त्या भागातील सिंह लुप्त झाल्याचे दिसून आले आहे. पण मेसोपोटेमिया आणि सिरियामध्ये मात्र १९ व्या शतकापर्यंत आणि इराण-इराकमध्ये २० व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत सिंहांचं अस्तित्व असल्याचा उल्लेख आहे.▪ (w15-E 05/01)