व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अणुबॉम्बच्या विस्फोटामुळे तयार झालेला मश्रूमच्या आकाराचा ढग.

जागे राहा!

राजकीय नेते ‘जगाच्या विनाशाचा’ इशारा देत आहेत—बायबल काय म्हणतं?

राजकीय नेते ‘जगाच्या विनाशाचा’ इशारा देत आहेत—बायबल काय म्हणतं?

 सोमवार १० ऑक्टोबर २०२२ च्या सकाळी रशियाच्या क्षेपणास्त्रांनी युक्रेनच्या बऱ्‍याच शहरांवर हल्ले केले. हे हल्ले, दोन दिवसांआधी क्रिमिया आणि रशियाला जोडणाऱ्‍या एका महत्त्वाच्या पुलावर झालेल्या मोठ्या विस्फोटाला प्रत्युत्तर म्हणून करण्यात आले होते. या घटनांच्या काही दिवसांआधीच राजकीय नेत्यांनी असा इशारा दिला होता की आज संपूर्ण जग ‘विनाशाच्या उंबरठ्यावर’ उभं आहे.

  •    “[अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ.] केनेडी यांच्या काळातल्या क्युबा क्षेपणास्त्र पेचप्रसंगानंतर पहिल्यांदाच हे जग पुन्हा एकदा विनाशाच्या (आर्मगेडन) उंबरठ्यावर येऊन पोचलंय. . . . जर अण्वस्त्रांचा वापर करण्यात आला तर निश्‍चितच या जगावर विनाश (आर्मगेडन) ओढवेल.”​—अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, ६ ऑक्टोबर, २०२२.

  •    “मीसुद्धा या गोष्टीशी सहमत आहे की आज जग विनाशाच्या (आर्मगेडन) उंबरठ्यावर उभंय. संपूर्ण पृथ्वी ग्रहासाठीच धोका निर्माण झालाय.”​—युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदीमिर झेलेन्स्की, अण्वस्त्रांचा वापर केल्यामुळे काय परिणाम होतील, या प्रश्‍नाचं उत्तर देताना असं म्हणाले, बीबीसी न्यूज, ८ ऑक्टोबर २०२२.

 जर अण्वस्त्रांचा वापर करण्यात आला तर जगावर खरंच विनाश ओढवेल का? बायबल याबद्दल काय म्हणतं?

अण्वस्त्रं वापरल्यामुळे जगावर विनाश ओढवेल का?

 नाही. राजकीय नेत्यांनी वापरलेला आर्मगेडन (मराठीत हर्मगिदोन) हा शब्द संपूर्ण बायबलमध्ये फक्‍त एकदाच, प्रकटीकरण १६:१६ इथे वाचायला मिळतो. हा शब्द जगातल्या देशांच्या आपसांतल्या युद्धाला सूचित करत नाही. तर ‘संपूर्ण पृथ्वीवरच्या राजांचं’ देवासोबत जे शेवटचं युद्ध होईल त्याला हा शब्द सूचित करतो. (प्रकटीकरण १६:१४) हर्मगिदोनच्या या युद्धात देव मानवी शासनाचा कायमचा नाश करेल.​—दानीएल २:४४.

 हर्मगिदोनच्या युद्धामुळे पृथ्वीवर काय परिणाम होईल हे जाणून घेण्यासाठी हर्मगिदोन म्हणजे काय? हा लेख वाचा.

अणुयुद्धामुळे पृथ्वीचा आणि पृथ्वीवर राहणाऱ्‍या लोकांचा नाश होईल का?

 नाही. मानवी शासकांनी भविष्यात अण्वस्त्रांचा वापर केला तरी देव पृथ्वीचा नाश होऊ देणार नाही. कारण बायबलमध्ये असं म्हटलंय:

  •    ‘पृथ्वी सर्वकाळ राहते.’​—उपदेशक १:४.

  •    “नीतिमान लोकांना पृथ्वीचा वारसा मिळेल, आणि ते तिच्यावर सर्वकाळ राहतील.”​—स्तोत्र ३७:२९.

 असं असलं तरी, बायबलमधल्या भविष्यवाण्या आणि अलीकडच्या घडामोडींवरून दिसून येतं, की लवकरच मानवी इतिहासाला कलाटणी देणाऱ्‍या घटना पृथ्वीवर घडतील. (मत्तय २४:३-७; २ तीमथ्य ३:१-५) भविष्याबद्दल बायबल काय सांगतं हे जाणून घेण्यासाठी चर्चेतून केल्या जाणाऱ्‍या मोफत बायबल अभ्यासाचा लाभ घ्या.