व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जागे राहा!

शाळांमध्ये गोळीबारांच्या घटना—बायबल काय म्हणतं?

शाळांमध्ये गोळीबारांच्या घटना—बायबल काय म्हणतं?

 २४ मे २०२२ ला अमेरिकेतल्या टेक्सस इथल्या उवाल्डे या छोट्या शहरात एक भयानक घटना घडली. याविषयी बातमी देताना, द न्युयॉर्क टाईम्स या वृत्तपत्राने म्हटलं, “रॉब एलिमेंटरी शाळेत एका तरुणाने १९ मुलांवर आणि २ शिक्षकांवर गोळीबार केला.”

 आजकाल आपल्याला अशा भयानक घटनांबद्दल नेहमीच ऐकायला मिळतं, ही फार दुःखाची गोष्ट आहे. यु.एस.ए. टुडे या वृत्तपत्राने असं म्हटलं, की फक्‍त अमेरिकेतच, “मागच्या वर्षी शाळांमध्ये २४९ वेळा गोळीबाराच्या घटना घडल्या. १९७० पासून आजपर्यंत एका वर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर अशा घटना कधीच घडल्या नव्हत्या.”

 या भयानक घटना का घडतात? अशा परिस्थितींमधून आपण कसं सावरू शकतो? हिंसाचार कधी कायमचा संपेल का? बायबल या प्रश्‍नांची उत्तरं देतं.

जगात इतका हिंसाचार का वाढत आहे?

  •    बायबलमध्ये म्हटलं आहे की आपण “शेवटच्या दिवसांत” जगत आहोत. या काळात, लोक “माया-ममता नसलेले” आणि “क्रूर” असतील. त्यामुळे ते कोणताही विचार न करता हिंसाचार करतील. बायबलमध्ये असंही म्हटलंय, की अशी वृत्ती असलेले लोक “दिवसेंदिवस आणखी वाईट होतील.” (२ तीमथ्य ३:१-५, १३) याबद्दल जास्त माहिती घेण्यासाठी, “जगात इतकं दुःख का?” हा लेख वाचा.

 बरेच लोक कदाचित असा विचार करतील, की ‘शाळेत होणाऱ्‍या गोळीबारासारख्या घटना देव का थांबवत नाही?’ बायबल याविषयी काय म्हणतं हे जाणून घेण्यासाठी, “चांगल्या लोकांसोबत वाईट होतं—असं का?” हा लेख वाचा.

अशा परिस्थितींमधून आपण कसं सावरू शकतो?

  •    “आधीपासूनच लिहून ठेवलेल्या सगळ्या गोष्टी, आपल्याला शिक्षण देण्यासाठी लिहून ठेवण्यात आल्या होत्या. या शास्त्रवचनांमुळे आपल्याला आशा मिळते.”—रोमकर १५:४.

 बायबलमधली तत्त्वं आपल्याला अशा परिस्थितींमधून सावरायला मदत करू शकतात. जास्त माहितीसाठी, “या जगातून कधी हिंसा नाहीशी होईल का?” हा सावध राहा! मासिकातला लेख पाहा.

 मुलं जेव्हा अशा घाबरवून टाकणाऱ्‍या बातम्या पाहतात, तेव्हा आईवडील त्यांना कशी मदत करू शकतात? याबद्दल जाणून घेण्यासाठी, “डिस्टर्बिंग न्युज रिपोर्ट्‌स ॲन्ड युअर चिल्डरन,” हा इंग्रजीतला लेख वाचा.

हिंसाचार कधी कायमचा संपेल का?

  •    “तो त्यांची अत्याचारापासून आणि हिंसेपासून सुटका करेल.”—स्तोत्र ७२:१४.

  •    “ते आपल्या तलवारी ठोकून नांगरांचे फाळ बनवतील आणि आपल्या भाल्यांपासून कोयते बनवतील. यापुढे एक राष्ट्र दुसऱ्‍या राष्ट्राविरुद्ध तलवार उचलणार नाही, आणि ते युद्ध करायलाही शिकणार नाहीत.”—मीखा ४:३.

 माणसं जे करू शकत नाहीत ते देव करू शकतो. स्वर्गातलं त्याचं सरकार सर्व शस्त्रांचा आणि सगळ्या हिंसाचाराचा कायमचा नाश करणार आहे. देवाचं राज्य आणखी काय-काय करणार आहे, हे जाणून घेण्यासाठी, “देवाच्या राज्यात ‘विपुल शांती असेल’” हा लेख वाचा.