व्हिडिओ पाहण्यासाठी

बायबलचा सारांश

बायबलचा सारांश

बायबल हे इतिहासातलं सगळ्यात जास्त वितरीत झालेलं पुस्तक आहे. आणि बऱ्‍याच लोकांना ते वाचायला आवडतं. त्यामुळे तुम्ही कदाचित असा विचार कराल, की या पुस्तकात नेमकं काय आहे?

बायबल—मानवजातीला कोणता संदेश देते?  या माहितीपत्रकात बायबलचा सारांश देण्यात आला आहे. यामुळे तुम्हाला बायबलचा मुख्य विषय समजायला मदत होईल. बायबलच्या उत्पत्ती पुस्तकातल्या निर्मीतीच्या अहवलापासून, ते प्रकटीकरणाच्या पुस्तकात दिलेल्या सुंदर भविष्याच्या आशेबद्दलची माहिती, तुम्हाला या माहितीपत्रकात मिळेल. बायबलमधल्या घटना कधी घडल्या आहेत हे समजण्यासाठी या माहितीपत्रकात घटनांचा कालक्रमही देण्यात आला आहे. तसंच, यात सुंदर चित्रं आणि विचार करायला लावतील असे प्रश्‍न चर्चेसाठी देण्यात आले आहेत.

बायबल—मानवजातीला कोणता संदेश देते?  हे माहितीपत्रक ऑनलाईन वाचा.