व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही तुमचं भविष्य निवडू शकता

तुम्ही तुमचं भविष्य निवडू शकता

एक चांगलं भविष्य मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे हे यहोवा देवाने जवळपास ३,५०० वर्षांपूर्वी आपल्या उपासकांना सांगितलं होतं. त्याने म्हटलं: “मी तुमच्यासमोर जीवन आणि मृत्यू, तसंच, आशीर्वाद आणि शाप ठेवत आहे. तुम्ही आणि तुमच्या वंशजांनी जीवन निवडावं, म्हणजे तुम्ही जगाल.”​—अनुवाद ३०:१९.

चांगलं भविष्य मिळवण्यासाठी त्या लोकांना योग्य निवड करायची होती. आज आपल्यासमोरही तेच पर्याय आहेत. चांगल्या भविष्याची निवड कशी करता येईल ते बायबलमध्ये सांगितलं आहे: “तुमचा देव यहोवा याच्यावर प्रेम करा, त्याचं ऐका.”​अनुवाद ३०:२०.

आपण यहोवावर प्रेम कसं करू शकतो आणि त्याचं कसं ऐकू शकतो?

बायबलमधून शिका: यहोवावर प्रेम करण्यासाठी तुम्ही आधी बायबलमधून त्याच्याबद्दल शिकलं पाहिजे. जसंजसं तुम्ही शिकाल तसंतसं तुम्हाला दिसून येईल, की यहोवा एक प्रेमळ देव आहे आणि तुमचं भलं व्हावं अशी त्याची इच्छा आहे. “त्याला तुमची काळजी आहे,” म्हणून तो तुम्हाला त्याला प्रार्थना करायचं प्रोत्साहन देतो. (१ पेत्र ५:७) बायबल असं वचन देतं, की तुम्ही जर त्याला जवळून ओळखण्याचा प्रयत्न केला, तर “तो तुमच्या जवळ येईल.”​—याकोब ४:८.

शिकलेल्या गोष्टी लागू करा: देवाचं ऐकणं म्हणजे त्याने बायबलमध्ये दिलेल्या त्याच्या सल्ल्याप्रमाणे वागणं. बायबल म्हणतं: “असं केलंस तर तू यशस्वी होशील आणि सुज्ञपणे वागशील.”​—यहोशवा १:८.