व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपण खरे मित्र कसे मिळवू शकतो?

आपण खरे मित्र कसे मिळवू शकतो?

आमच्या तरुण मित्रांकरता

आपण खरे मित्र कसे मिळवू शकतो?

सूचना: मन एकाग्र करता येईल अशा शांत ठिकाणी बसून पुढे सांगितलेल्या गोष्टींचा सराव करा. शास्त्रवचने वाचताना, या घटनेत तुम्ही देखील आहात अशी कल्पना करा. घटनेतील दृश्‍ये डोळ्यांपुढे उभी करा. तेथील आवाज ऐका. पात्रांच्या भावना अनुभवण्याचा प्रयत्न करा. दिलेला अहवाल जिवंत करा.

मुख्य पात्रे: योनाथान, दावीद आणि शौल

सारांश: दाविदाने गल्याथाला ठार मारल्यानंतर, योनाथान दाविदाचा जिवलग मित्र बनतो.

दृश्‍याचे परीक्षण करा.—१ शमुवेल १७:५७–१८:११; १९:१; २०:१-१७, ४१, ४२ वाचा.

शौल कसा दिसतो, त्याची कल्पना करून वर्णन करा. (क्लू: १ शमुवेल १०:२०-२३ पाहा.)

_______

दावीद आणि योनाथान एकमेकांना भेटले तेव्हा दावीद एक किशोरवयीन होता. तुम्हाला काय वाटते, तो कसा दिसत असावा? (क्लू: १ शमुवेल १६:१२, १३ पाहा.)

_______

पहिले शमुवेल पुस्तकाच्या २० व्या अध्यायात आपण वाचतो, की दावीद आणि योनाथान यांची ताटातूट होते. त्यावेळी एकमेकांशी बोलताना त्यांचा आवाज कसा झाला असेल?

_______

आणखी खोलात शिरा.

अहवालात म्हटले आहे, की ‘योनाथानाचे मन दाविदाच्या मनाशी जडले’ म्हणजे कंटेंप्ररी इंग्लिश व्हर्शन यात म्हटल्याप्रमाणे, “दावीद आणि योनाथान एकमेकांचे जिवलग मित्र बनले.” (१ शमुवेल १८:१) दाविदात असे कोणते गुण होते ज्यामुळे योनाथानाला दावीद इतका आवडू लागला होता? (क्लू: १ शमुवेल १७:४५, ४६ पाहा.)

_______

दावीद आणि योनाथान यांच्यात जवळजवळ ३० वर्षांचा फरक होता. तरीपण ते एकमेकांचे “जिवलग मित्र” कसे बनले असावेत?

_______

या चित्तवेधक अहवालात वाचल्याप्रमाणे, एक सच्चा किंवा खरा मित्र कोण असतो? (क्लू: नीतिसूत्रे १७:१७; १८:२४ पाहा.)

_______

आपल्या वडिलांप्रती एकनिष्ठ राहण्यापेक्षा योनाथानाने दाविदाशी एकनिष्ठ राहण्याला जास्त महत्त्व का दिले?

_______

शिकलेल्या गोष्टींचा अवलंब करा. तुम्ही जे शिकलात ते लिहून काढा . . .

मैत्री.

_______

एकनिष्ठा.

_______

आपल्यापेक्षा वयाने मोठे असलेल्यांबरोबर मैत्री.

_______

चांगले गुण असलेल्या मित्रांबरोबर तुम्ही मैत्री कशी करू शकता?

_______

या अहवालातील कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात अर्थपूर्ण वाटते? व का?

_______

(w१०-E ०७/०१)

तुमच्याजवळ बायबलची प्रत नसेल तर यहोवाच्या साक्षीदारांकडे मागा, किंवा पुढील वेबसाईटवरील निवडक भाषांतून ऑनलाईन पाहा www.watchtower.org