व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही देवाला किती चांगल्या प्रकारे ओळखता?

तुम्ही देवाला किती चांगल्या प्रकारे ओळखता?

तुम्ही देवाला किती चांगल्या प्रकारे ओळखता?

एका नामवंत व्यक्‍तीशी बोलण्याचे आमंत्रण मिळणे खरोखरच एक सन्मानाची गोष्ट आहे. उच्च पदावर असलेल्यांना सहसा, “आदरणीय” किंवा “सन्माननीय” अशा पदव्यांनी संबोधले जाते. तेव्हा, उच्च पदावर असलेल्या कोणी आपल्याला “तुम्ही मला माझ्या नावाने बोलवू शकता,” असे सांगितले, तर आपल्याला आभाळ ठेंगणे वाटू लागेल.

खरा देव आपले वचन बायबल यात असे सांगतो: “मी यहोवा आहे; हे माझे नाव आहे.” (यशया ४२:८, पं.र.भा.) * यहोवा देवाच्या अनेक पदव्या आहेत. जसे की “निर्माणकर्ता,” “सर्वसमर्थ” व “पवित्र बापा.” तरीपण, त्याच्या वैयक्‍तिक नावाने बोलवण्याची संमती देऊन त्याने आपल्या एकनिष्ठ सेवकांना सन्मानित केले आहे.

जसे की, जेरुसलेम येथील मंदिराच्या उद्‌घाटन प्रसंगी राजा शलमोनाने, “हे यहोवा” या शब्दांनी प्रार्थनेला सुरुवात केली. (१ राजे ८:२२, २३, पं.र.भा.) संदेष्टा एलिया याने देखील देवाला अशी विनवणी केली: “हे यहोवा, मला उत्तर दे.” (१ राजे १८:३७, पं.र.भा.) आणि संदेष्टा यशया याने इस्राएल लोकांच्या वतीने देवाला प्रार्थना करताना म्हटले: “हे यहोवा, तू आमचा बाप आहेस.” (यशया ६३:१६, पं.र.भा.) या वचनांवरून स्पष्ट होते, की आपण आपल्या स्वर्गीय पित्याला त्याच्या नावाने हाक मारावी अशी त्याची इच्छा आहे.

यहोवाला त्याच्या नावाने हाक मारणे महत्त्वाचे असले तरी, त्याच्या नावाने त्याला ओळखण्यात बरेच काही गोवलेले आहे. यहोवावर प्रेम करणाऱ्‍या व त्याच्यावर भरवसा ठेवणाऱ्‍या एका व्यक्‍तीबद्दल बोलताना त्याने असे म्हटले: “त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्च स्थळी सुरक्षित ठेवीन.” (स्तोत्र ९१:१४) म्हणजेच, आपण जर देवाकडून सुरक्षितता मिळवू इच्छितो तर त्याच्या नावाने त्याला ओळखण्यात काय सामावलेले आहे हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्हाला काय करावे लागेल? (w१०-E ०७/०१)

[तळटीप]

^ या लेखमालेत उद्धृत केलेल्या वचनांत, केवळ पंडिता रमाबाई भाषांतर या मराठी बायबलमध्येच, यहोवा हे देवाचे नाव वापरण्यात आले आहे; इतर मराठी बायबल भाषांतरांमध्ये ते वापरण्यात आलेले नाही. पण, ज्या मूळ भाषेत बायबलचे लिखाण झाले होते त्यात, यहोवा हे देवाचे नाव त्या सर्व वचनांत वापरण्यात आले आहे.