व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग १

आनंदी विवाहासाठी देवाचे मार्गदर्शन स्वीकारा

आनंदी विवाहासाठी देवाचे मार्गदर्शन स्वीकारा

“उत्पन्नकर्त्याने सुरुवातीलाच नरनारी अशी ती निर्माण केली.”—मत्तय १९:४

मानव इतिहासातील सगळ्यात पहिले लग्न यहोवा * देवाने लावले. बायबल म्हणते, की त्याने पहिली स्त्री बनवली आणि तिला पहिल्या पुरुषाकडे अर्थात “आदामाकडे नेले.” तिला पाहून आदामाला इतका आनंद झाला की त्याने म्हटले: “आता ही मात्र माझ्या हाडांतले हाड व मांसातले मांस आहे.” (उत्पत्ति २:२२, २३) आजही वैवाहिक जोडप्यांनी आनंदी राहावे अशी यहोवाची इच्छा आहे.

तुमचे लग्न होते तेव्हा सगळे काही सुरळीत चालेल असे कदाचित तुम्हाला वाटेल. पण खरे पाहता, एकमेकांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या पती-पत्नीलादेखील कोणत्या ना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो. (१ करिंथकर ७:२८) या माहितीपत्रकात तुम्हाला बायबलची तत्त्वे आढळतील; त्यांचा अवलंब केल्यास तुमचे वैवाहिक व कौटुंबिक जीवन आनंदी होऊ शकते.—स्तोत्र १९:८-११.

१ यहोवाने दिलेली भूमिका स्वीकारा

बायबल काय म्हणते: पती कुटुंबाचे मस्तक आहे.—इफिसकर ५:२३.

पती या नात्याने तुम्ही तुमच्या पत्नीची कोमलतेने काळजी घ्यावी अशी अपेक्षा यहोवा तुमच्याकडून करतो. (१ पेत्र ३:७) त्याने पत्नीला तुमच्यासाठी एक अनुरूप साहाय्यक म्हणून बनवले. तेव्हा, तिच्याशी आदराने आणि प्रेमाने वागावे अशी अपेक्षा तो तुमच्याकडून करतो. (उत्पत्ति २:१८) तुमचे तुमच्या पत्नीवर जिवापाड प्रेम असेल, तर स्वतःचा विचार करण्याआधी तुम्ही प्रथम तिचा विचार कराल.—इफिसकर ५:२५-२९.

पत्नी या नात्याने तुम्ही तुमच्या पतीचा मनापासून आदर करावा व त्याची भूमिका पार पाडण्यास त्याला मदत करावी अशी अपेक्षा यहोवा तुमच्याकडून करतो. (१ करिंथकर ११:३; इफिसकर ५:३३) पती काही निर्णय घेतो तेव्हा त्याच्या पाठीशी उभे राहा आणि कुरकूर न करता त्याला पूर्ण सहकार्य करा. (कलस्सैकर ३:१८) असे केल्यास तुम्ही तुमच्या पतीच्या आणि यहोवाच्या नजरेत मौल्यवान व्हाल.—१ पेत्र ३:१-६.

तुम्ही काय करू शकता:

  • आणखी चांगला विवाहसोबती बनण्यासाठी मला कोठे सुधारणा करण्याची गरज आहे हे एकमेकांना विचारा. सोबती जे काही सांगेल ते लक्ष देऊन ऐका आणि सुधारणा करण्यासाठी होता होईल ते करा

  • एकमेकांना आनंदी कसे ठेवता येईल हे शिकण्यासाठी दोघांनाही वेळ लागेल. तेव्हा, धीर धरा

२ सोबत्याच्या भावनांची मनापासून कदर करा

बायबल काय म्हणते: तुम्ही नेहमी तुमच्या विवाहसोबत्याचे हित पाहिले पाहिजे. (फिलिप्पैकर २:३, ४) यहोवा आपल्या सेवकांकडून अशी अपेक्षा करतो की त्यांनी ‘सर्वांबरोबर सौम्यतेने’ वागावे. हे लक्षात घेऊन, आपल्या विवाहसोबत्याशी सौम्यपणे वागा. (२ तीमथ्य २:२४) बायबल म्हणते: “कोणी असा असतो की तरवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करतो, परंतु सुज्ञांची जिव्हा आरोग्यदायी आहे.” तेव्हा, आपल्या शब्दांची विचारपूर्वक निवड करा. (नीतिसूत्रे १२:१८) एकमेकांशी प्रेमळपणे बोलण्यास यहोवाचा पवित्र आत्मा तुम्हाला मदत करू शकतो.—गलतीकर ५:२२, २३; कलस्सैकर ४:६.

तुम्ही काय करू शकता:

  • विवाहसोबत्याशी गंभीर विषयांवर चर्चा करण्याआधी, मन शांत ठेवण्यासाठी व सोबत्याचेही विचार ऐकून घेण्यासाठी देवाला प्रार्थना करा

  • तुम्ही काय बोलणार व कसे बोलणार याचा काळजीपूर्वक विचार करा

३ दोघे मिळून विचार करा

बायबल काय म्हणते: तुमचा विवाह होतो तेव्हा तुम्ही दोघे “एकदेह” होता. (मत्तय १९:५) पण असे असले, तरी तुम्ही दोघे वेगवेगळ्या व्यक्ती आहात व तुमची मतेही वेगवेगळी असू शकतात. त्यामुळे एकमेकांच्या विचारांशी व भावनांशी जुळवून घेण्यास तुम्हाला शिकावे लागेल. (फिलिप्पैकर २:२) कोणतेही निर्णय घेताना एकमत असणे खूप गरजेचे असते. बायबल म्हणते: “प्रत्येक बेत मसलतीने सिद्धीस जातो.” (नीतिसूत्रे २०:१८) तेव्हा, महत्त्वाचे निर्णय एकत्र मिळून घेताना बायबलची तत्त्वे विचारात घ्या.—नीतिसूत्रे ८:३२, ३३.

तुम्ही काय करू शकता:

  • आपल्या सोबत्याला केवळ माहितीच देऊ नका किंवा त्याच्याकडे फक्त आपली मतेच व्यक्त करू नका, तर भावनाही व्यक्त करा

  • एखाद्याला शब्द देण्याआधी आपल्या सोबत्याशी बोला

^ परि. 4 बायबलमध्ये देवाचे नाव यहोवा असे दिले आहे.