व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

”उशीर ना त्याला!” (२०२३ अधिवेशनाचं गीत)

”उशीर ना त्याला!” (२०२३ अधिवेशनाचं गीत)

(हबक्कूक २:३)

  1. १. पाहतो आम्ही, साऱ्‍या सृष्टीला,

    रंगांची बहार, दिलीस याह तिला.

    थांबलास तू, काळासाठी त्या,

    नव्याने पुन्हा, घडवण्या तिला.

    (कोरस)

    नंदनवनाची याह, लागली ओढ आम्हा.

    बळ दे तू धीर धरण्या!

    रोखेल कोणी ना, तुझ्या त्या राज्याला.

    जिंकेल दाही दिशा!

    “उशीर ना त्याला!”

  2. २. सारे प्रिय ते, गेले दूर जे,

    आतुर तू याहा, त्यां साद घालण्या.

    झालो रे अधीर, त्यांना भेटण्या,

    दे धीर आम्हा, तुझ्याचसारखा.

    (कोरस)

    नंदनवनाची याह, लागली ओढ आम्हा.

    बळ दे तू धीर धरण्या!

    रोखेल कोणी ना, तुझ्या त्या राज्याला.

    जिंकेल दाही दिशा!

    “उशीर ना त्याला!”

  3. ३. रोपं कोवळी, नम्र जे मनी,

    शोधूनी त्यांना, आणू जवळ तुझ्या.

    छाया आशेची, देई गारवा,

    बहरतील ते, जगामध्ये नव्या!

    (कोरस)

    नंदनवनाची याह, लागली ओढ आम्हा.

    बळ दे तू धीर धरण्या!

    रोखेल कोणी ना, तुझ्या त्या राज्याला.

    जिंकेल दाही दिशा!

    “उशीर ना त्याला!”

    बळ दे धीर धरण्या बापा!

(कलस्सै. १:११ सुद्धा पाहा.)